न्युज डेस्क:- जाफराबाद शहरात आनंद बुद्ध विहार येथे आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बैठकीमध्ये शहर उत्सव समिती कार्यकारिणी सर्वानुमते गठित करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष पदी माजी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद सोनुने तर कार्याध्यक्ष पदी माजी सैनिक धम्मा दांडगे यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष – प्रमोद हिवाळे, सचिव – राहुल भटकर, कोषाध्यक्ष – निखिल हिवाळे, सहसचिव – अमोल हिवाळे, उपसचिव – राहुल भटकर, प्रसिद्धी प्रमुख – राहुल गवई आदींची निवड करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी समिती तर्फे देण्यात आली आहे. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.