पोलीस निरीक्षक श्री.प्रताप इंगळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जाफराबाद प्रतिनिधी दिनांक: १३\०८\२०२४ येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक १२ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान अँटीरॅगिंग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त महाविद्यालयात दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी अँटीरॅगिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख यांनी भूषविले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.प्रताप इंगळे यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री.राजधार पठाडे तसेच सिद्धार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे,उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँटीरॅगिंग समितीचे समन्वयक तथा उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे यांनी केले. यावेळी त्यांनी माननीय सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशान्वये प महाविद्यालयांमध्ये दिनांक १२ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान अँटीरॅगिंग सप्ताह साजरा करण्याचे आदेशीत असल्याचे सांगितले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्र अँटीरॅगिंग कायदा याविषयी प्रबोधन करणे, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये अँटीरॅगिंग विषयी जनजागृती करणार। असल्याचे सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक श्री.राजधर पठाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र अँटीरॅगिंग ऍक्ट समजावून सांगताना भारतीय न्याय संहिता अंतर्गत एखाद्या वरिष्ठ विद्यार्थ्याने कनिष्ठ विद्यार्थ्यास रोखून बोलणे, मारहाण करणे, मानसिक छळ करणे किंवा त्यास अपमानित करणे हे अँटी रॅगिंग प्रकार असून त्याविरोधात दाद मागण्यासाठी महाविद्यालयामध्ये अँटीरॅगिंग समितीमार्फत दाद मागता येते.तसेच रॅगिंग करणे किंवा रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांला पाठिशी घालणे कायदेशीर गुन्हा असुन त्यामध्ये रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला महाविद्यालयातून काढून टाकने किंवा गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई होऊ शकत असल्याचे सांगितले. प्रमुख मार्गदर्शक पोलीस निरीक्षक श्री.प्रताप इंगळे यांनी अँटीरॅगिंग प्रकार सांगून त्या विरोधात न्याय मागण्यासाठी ११२ नंबर डायल करून पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.रमेश देशमुख यांनी अँटीरॅगिंग हा प्रकार पूर्वापार चालत आला असून अलीकडच्या काळात कायदेशीर कारवाईमुळे त्यावर आळा बसला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनंदा सोनुने यांनी केले तर आभार प्रा.सरिता मणियार यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अँटीरॅगिंग समितीचे सदस्य प्रा.उदय वझरकर प्रा.सिद्धार्थ पैठणे, प्रा.डॉ सारिका जाधव, प्रा.निर्मला खांडेभराड,यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.