जाफराबाद दि.२४
जाफराबाद येथे दि २४ रोजी सकाळी १२.०० वाजेला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात बदलापूर घेटनेच्या विरोधात व त्या अपराध्याला तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी जाफराबाद तालुक्याच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. यासारख्या अन्य घटेने विरोधात माहविकास आघाडी च्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती.मात्र मा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद न करता काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
सध्या काळात लोकशाही मानणाऱ्या देशात “फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन” ही गोष्ट आहे की नाही?मोर्चे,संप याला बंदी केलीय का? जनतेने भावना व्यक्त करण्यासाठी बंद करायचा नाही का?असे अनेक प्रश्न जनतेसमोर पडत आहे. सरकार व न्याय व्यवस्था नेमकी कुणाच्या बाजूने आहे,हे देखील कल्पनेकपालिकडे दिसत आहे.अशा अनेक गोष्टी विरोधात आज जाफराबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी रमेश पा. गव्हाड, रामधन पा. कळंबे, सुरेश गवळी, उत्तमराव वानखेडे, सुरेखाताई लहाने, कुंडलिक पा मुठ्ठे, ज्ञानेश्वर शिंदे, समाधान सवडे, अजय बनकर,योगेश कापसे, साबेत चाऊस,बबलू भाई, देविसींह बायस, मेहबूब पठाण, शेख मोईज,समीर शहा, रमेश वाघमारे, शेख आसिफ, प्रेमानंद जाधव, रामेश्वर खांडेभराड,परमेश्वर मोरे, परमेश्वर सरोदे, विष्णू लोखंडे, गणेश गाडेकर, नंदु गायकवाड,संतोष अंभोरे, विनायक गायकवाड,मुरलीधर भोपळे, साईनाथ सवडे,गणेश ठाकरे, शेख इरफान, विठ्ठल खपुटे, प्रमोद फदाट,भगवान मुळे, भास्कर फदाट,पंकज लोखंडे, सुभाष काळे,लक्ष्मण काळे,संतोष भोपळे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता…