प्रतिनिधी( दिनांक२३ ऑगस्ट २०२४) येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष माननीय. दादासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली निषेध नोंदविण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे प्रा. अनिल वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.